सुप्रभात मित्रानो
सकाळचे ४ वाजतायत, माझ्या साठाव्या वर्ष्याच्या पदार्पणातील पहिल्या पाहटे मध्ये सामील व्हायला सग्ळ्यांना आमंत्रित करतोय. मला माहित आहे आपल्यातील कित्येक जणांना हा टप्पा गाठायला अजून २/३ वर्ष असतील.. रात्री १० ते पहाटे पाच अशी एक मस्त सुधृढ झोपेची निसर्गदत्त देणगी मला आहे . जिथे आपण म्हणतो You're only here for a short visit ( फिलॉसॉफिकल ) त्यात ह्या सध्याच्या विचित्र काळात ५९ वर्षाचा अस्तित्वं हि एक वेगळीसच फिलिंग देते. कदाचित त्याचमुळे मध्यरात्री २ ला जाग आली असेल , डोळे मिटून गाव ते कालपर्यंतचा प्रवास flashback मध्ये fast-forward जात होता . पण , पण अशा सुचीर्भूत क्षणांत काय मिळवलं , काय करू शकलो , कुठे कमी पडलो, कुठे चुकलं कुठे या झंझाळालात पडायची इच्छा नव्हती. सहजच फोन उचलला तर दोन wishes येऊन धडकल्या होत्या.
ठरवलं काहीतरी "हटके" करू या. अरे कुणाला आठवत का कि advance किंवा डीप्लोमाला आपल्या कॉलेज मध्ये एक हस्त लिखित बनणार होत त्या साठी students कडून लेख /कविता मागितल्या होत्या. जेव्हा क्रिकेटर ऍक्टर बनू पाहत होता ( संदीप पाटील ), ऍक्टर गात होता ( श्रीमान बच्चन जी ) तेव्हा ठरवलं आपण काय घोड मारलंय. शाब्दिक वळवळ तर अशीही करतोच कि .... तर तेव्हा लिहिलेली मुक्त छंदातील एक कविता ( ????) share करतोय.
कवितेचं नाव : मतलबी
निर्धार होता सिकंदरचा
जिद्ध होती कोलंबसची
जगावर राज्य करण्याची सप्त समुद्रापलीकडे पाय रोवण्याची
पण....
होडी होती कागदाची
सोसाट्याच्या वाऱ्यात
थैमानी पावसात
होडी आपटली लाटेवर
पण फुटली नाही
हो, फुटली असती कदाचित
तर बांधली असती पुनःश्च
दुर्दम्य इच्छेच्या बळावर
पण तसं झालंच नाही
होडी गेली चक्क विरघळून
पाण्यामध्ये पाण्यासारखी होऊन
मन हरलं नव्हतं , हरायला तयार नव्हतं !
आता निवडला साथी
पहिल्यापेक्षा बलशाली
आकाशात उत्तुंग झेपावण्यासाठी
गरुड .....
ऐकून होतो त्याचा प्रताप , त्याची झेप
एकाच झेपेत पादाक्रांत केले
मनोविश्वाचे सर्व प्रदेश
पण दैव दुर्विलास !!
येथेही गटांगळ्या खातच होतो
कारण गरुड नव्हता साथीला
असं का झालं ? असं का व्हावं ??
आता आलं ध्यानात
होडीने केले होते पाण्याशी संगनमत
तर गरुडाला मिळाले होते त्याचे भक्ष
मग त्याला कशी असणार कदर
माझ्या विश्वाची , इच्छेची
त्याच्या नजरेत मी होतो एक स्वार्थी
फक्त आपल्या इच्छापूर्ती साठी
अनेकांना राबवून घेणारा
.... मतलबी ....
महेश आंजर्लेकर
२ जानेवारी १९८४


